Share

काळजी करू नका केंद्राची वाट न पाहता पोल्ट्री उद्योगाला हात देण्यात येईल – सुनील केदार

Published On: 

परभणी : देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारने त्या संदर्भातील उपाययोजना सुरु केल्या आहेत.

परभणीत 3 दिवसांपूर्वी मुरुंबा तालुक्यातील 800 कोंबड्याचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर आली आहे. परभणी जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. यामुळे राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत.

आता परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या मेल्याचं आढळून आल्याने परभणीतील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहे, असं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं. तसेच राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही कोंबड्यांचे सँपल भोपाळला पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत, असं केदार यांनी सांगितलं.

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहेत. कोंबड्या मारण्यासाठी पाच फुटाचा खड्डा खोदण्यात येणार येईल. त्यात केमिकल्स टाकून कोंबड्या मारण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

तर, राज्याने 2006मध्येही बर्ड फ्ल्यूचं संकट पाहिलं होतं. त्यावेळीही राज्य सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत केली होती. पोल्ट्री व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ही अर्थ व्यवस्था डबघाईला जाऊ देणार नाही. पोल्ट्री व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्राची वाट न पाहता पोल्ट्री उद्योगाला हात देण्यात येईल, असं सुमील केदार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!