Share

Sanjay Raut | “बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा कट”; संजय राऊत यांचे गंभीर आरोप 

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Borderism) चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीतील जत तालुक्यावर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्रात वातावरण बिघडलं आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट असल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.

30 मार्च 2018 ला संजय राऊतांनी कर्नाटकात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत म्हणाले, “बेळगाव कोर्टाचे मला समन्स हा नक्कीच कट आहे. त्यांना माझ्यावर हल्ला करायचाय. मला अटकही करण्याचा डाव आहे. त्यांची पूर्ण तयारी झाली आहे. पण महाराष्ट्र घाबरणारा आणि झुकणारा नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी नक्की तिथं जाणार आणि आपली बाजू मांडणार.”

“आज सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक-महाराष्ट्र वादावर सुनावणी आहे. अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केला आहे. काल मला बेळगाव कोर्टाचे समन्स आले. हे काय चाललंय? क्रोनॉलॉजी समजून घ्या. अचानक कर्नाटकच्या बाजूने राजकारण का तापलं आहे? यामागे राजकारणही आहे आणि निवडणुकाही आहेत. माझं अमित शाह यांना आवाहन आहे की तुम्ही त्याकडे लक्ष द्या. नाहीतर आम्हाला भीती वाटतेय की इथे रक्तपात होऊ शकतो”, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!