🕒 1 min read
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे सध्याचे चित्र आहे. विधानसभेत आज लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना लक्षवेधी क्रमांक दोन मध्ये अधिकाऱ्यांकडून विधानसभेऐवजी विधानपरिषद असं लिहीण्यात आलं. या दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार हे अधिवेशनात चांगलेच भडकल्याचे दिसून आले.
विधानसभेत आज लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना लक्षवेधी क्रमांक दोन मध्ये अधिकाऱ्यांकडून विधानसभेऐवजी विधानपरिषद असं लिहीण्यात आलं. यावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. आपण सर्वंच सकाळ पासून येऊन बसतो रात्रीपर्यंत काम करतो. मात्र, आता दुसऱ्या लक्षवेधीकडे बघितलं तर यात ‘महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सुचना’ असे लिहिले आहे. आपण विधानसभेत काम करतो, विधानपरिषदेत नाही, ही ज्याची कोणीची चूक आहे, त्याने यावर दिलगीरी व्यक्त करावी, तुम्ही फुकट काम करत नाही, यासाठी तुम्हाला सरकार सातवा वेतन आयोग देते, यापुढे अशी चुक झाल्यास सरकारने त्यांना निलंबित करावे”, असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Gargi Film Review : साई पल्लवीचा हा सिनेमा बघायलाच हवा! समाजातील विदारक सत्य सांगणारी गोष्ट
- Nitin Gadkari | “सरकार वेळेवर निर्णय घेत नाही” ; नितीन गडकरींनी पुन्हा सुनावले खडे बोल
- Assembly Session 2022 | “असे धमकावू नका!” ; अजित पवारांनी भाजप नेत्याचे विधानसभेत टोचले कान
- Shantishri Dhulipudi । “हिंदू देवही उच्च जातीचे नाही, भगवान शंकरही शूद्र…”; जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांचं विधान
- Assembly Session 2022 | विधानसभा अध्यक्ष सत्तारूढ पक्षाचे काम करतात? जयंत पाटलांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
