Share

आर्थिक चणचणीत मनपाला दिलासा! सीएसआर निधीतून कोरोनाला रोखण्यासाठी मिळाला ‘इतका’ निधी

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारला मिळणाऱ्या सीएसआर निधीतून कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेला २ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून १५ अ‍ॅम्ब्युलन्स, रेफ्रिजिरेटर, डिफ्रेजरसह विविध वस्तूंची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी बुधवारी (दि.१४) दिली.

मागील दिड महिन्यापासून राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. औरंगाबादेतही कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारला उद्योगांचे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत प्राप्त निधीतून कोरोनाच्या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा निधी पालिकेला उपलब्ध करून द्यावा, यासाठी पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सरकारकडे सीएसआर निधी मिळावा, अशी मागणी केली होती.

त्यानुसार राज्य सरकारने सीएसआरमधून दोन कोटीचा निधी पालिकेला उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून पंधरा छोटया अ‍ॅम्ब्युलन्स, रेफ्रिजिरेटर, डिफ्रेजरसह विविध प्रकारची खरेदी करण्याची सूचना केली आहे. शहरातील गल्ली बोळात जाणार्या छोटया अ‍ॅम्ब्युलंन्सची खरेदी केली जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी माहिती देताना नमूद केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालिकेला कोरोना उपाययोजना व उपचारासाठी १ कोटी ५९ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टेस्टीेंग कीट, आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते, लॅबचे बळकटीकरण, मनुष्यबळ वाढविणे या कामासाठी हा निधी खर्च केला जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!