Share

बंगाल निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवाराचा कोरोनाने मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे.

दुसरीकडे देशातील पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. यामध्ये राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. तर बंगाल मधील निवडणूक प्रचार जीवघेणा ठरत आहे. काँग्रेसच्या एका उमेदवाराने यामुळे आपला जीव गमावला आहे.

मुर्शिदाबादमधील समसेरगंज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरलेल्या रिजाउल हक यांचे कोरोनामुळे गुरुवारी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समसेरगंज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रिजाउल हक यांचे मध्यरात्री कोरोनामुळे निधन झाले. आपण ज्या वास्तविकतेचा सामना करत आहोत त्याला समजून घ्या आणि या वर्षी जिवंत रहा’, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सचिव रोहन मित्रा यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!