🕒 1 min read
मुंबई : सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना महिन्याला पाच हजार रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील दिले आहे.
#वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल असे #सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी आयोजित बैठकीत सांगितले. pic.twitter.com/PKSF1mKJAi
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) September 8, 2021
कोरोनाकाळात वारकरी संप्रदायाचे कीर्तने, प्रवचने बंद असल्याने छोट्या मोठ्या कीर्तनकार, प्रवचनकार यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली तर काही जणांना उपासमारीला देखील सामोरे जावे लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत.
त्यात कीर्तनकार-प्रवचनकार दुसरं कोणतं कामंही करु शकत नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून मदतीची गरज होती. अखेर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’ दाखवल्यामुळे कीर्तनकारांमध्ये आनंदाचे वातावरण ओअहय्ल मिळत आहे.
सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात बैठक विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. वारकरी साहित्य परिषदेने काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावं, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य असं संतपीठ उभं रहावं या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या मागण्या बैठकीत मांडल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना आ.सरनाईक फौजदारी कारवाई करणार
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
