ठाणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन विषयावर पालिका आयुक्तांना भेटायला येणार आहे, असे ट्विट केले. त्यानंतर आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी त्यांच्याकडून २१ कोटी रुपये वसूल करावे, अशी मागणी केली. मात्र, सोमय्या यांनी सरनाईक यांच्याबाबत पुन्हा एकदा चुकीची माहिती दिल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे सरनाईक यांचे वकिल अमित नाडकर्णी यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांना दि. १७ व २२ डिसेंबर २०२० रोजी आमदार सरनाईक यांनी त्यांची खोट्या माहितीच्या आधारे मानहानी केल्याबाबत नोटीस देऊन माफी मागण्याचा पर्याय दिला होता. त्यावर सोमय्या यांनी ३० डिसेंबर रोजी त्रोटक जबाब उत्तरादाखल दिला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ७ जुलै रोजी सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटींचा नुकसानभरपाईचा दिवाणी दावा दाखल करण्यात आला. या दाव्यामध्ये कोर्टाने नोटीस काढलेली आहे. याची जाणीव असूनदेखील त्यांनी सरनाईक यांच्याविरोधात पुन्हा चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे सरनाईक यांच्यावतीने नाडकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, सोमय्या यांनी बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला. ‘आम्ही पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेतली. विहंग गार्डन इमारतमधील लोकांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेने त्यांच्याकडून २१ कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी मी आयुक्तांना केली आहे. त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी मी आज आलो होतो’, असं सोमय्या म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार घेणार मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा!
- रामदास आठवलेंकडून एमआयएम खा.ओवैसींच्या ‘त्या’ वक्तव्याचे समर्थन, म्हणाले..
- अँटिलिया स्फोटक प्रकरण, बोगस पुराव्यासाठी परमबीर सिंह यांनीच दिली ५ लाखांची लाच
- मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर
- धनंजय मुंडेंना होमपिचवर गुगली! करुणा शर्मा यांच्या समर्थनात भाजप मैदानात उतरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
