🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. कृषी सुधारणा विधेयकांना देशभरातून विरोध होत असताना तसेच सर्वपक्षीय खासदार या विधेयकाच्या विरोधात असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता, विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयके मंजूर करुन घेतली.
देशभरातील शेतकरी तसेच सर्वसामान्य माणूस या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. काँग्रेस पक्ष हा कायम शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करीत राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. राज्यभरात काँग्रेसच्या हॅशटॅग स्पिकअप फॉर फार्मर्स या ऑनलाईन मोहिमेत काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याचे काम या नव्या कायद्यामुळे होणार आहे.
मोदी सरकारने मंजूर केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन, मोर्चे काढणार आहे. याबाबत आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. तसेच एक कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार आहे. अन्नदात्याला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष केंद्रातील भाजप सरकार विरोधात संघर्ष करीत राहणार असल्याचे ना.थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९१ वा वाढदिवस!
- राज्यात लवकरच सत्तांतर होईल; भाजपच्या या माजी मंत्र्याचे भाकित!
- स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यामुळेच मी राज्याचा मंत्री झालो- शंकरराव गडाख
- भाजपने सत्तेचे गड जिंकले मात्र एनडीए मधील ‘दोन सिंह’ मात्र गमावले; शिवसेनेचा भाजपवर घणाघात
- ‘या’ खेळाडूने केले अफलातून क्षेत्ररक्षण क्रिकेटच्या देवाने देखील केले कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
