मुंबई : सुरुवातीला आईपीएल होईल की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती कारण कोरोनामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. सामने सुरू असताना प्रेक्षकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विनाप्रेक्षक सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला यावर्षी आयपीएल भारतात होत नसून UAE त होत आहे.
ड्रीम ११ IPL २०२० चांगलीच गाजत आहे. काल किंग्स ११ पंजाब आणि राजस्थान रॉयल यांच्यातील चालू असलेल्या सामन्यात फिल्डींगचा एक चांगला नमुना पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान किंग्ज इलेवन पंजाबचा गोलंदाज मुरुगन अश्विनने टाकलेला चेंडू स्ट्राइकवर असलेला राजस्थान रॉयल्सचा फलंदाज संजू सॅमसनने टोलवला. षटकार नक्की असे वाटत असतानाच निकोलस पूरन याने अविश्वसनीय अशी झेप घेतली. चेंडू हवेतच पकडून बाहेर ढकलला. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी धावत 2 धावा केल्या. मात्र पूरनच्या अप्रतिम फिल्डिंगमुळे चार धावा वाचवण्यात आला.
त्याच्या या क्षेत्ररक्षणाचे क्रिकट रसिकांसह दिग्गजांनी कौतुक केले आहे. तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील यावर ट्विट केले आहे. ‘माझ्या आयुष्यात पाहिलेले सर्वात चांगले क्षेत्ररक्षण. खरोखरच अविश्वसनीय.’ असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या सामन्यात निकोलस पूरनच्या फिल्डिंगचे चांगलेच कौतुक होत आहे.
This is the best save I have seen in my life. Simply incredible!! ????#IPL2020 #RRvKXIP pic.twitter.com/2r7cNZmUaw
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 27, 2020
महत्वाच्या बातम्या :-
- शेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन
- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९१ वा वाढदिवस!
- राज्यात लवकरच सत्तांतर होईल; भाजपच्या या माजी मंत्र्याचे भाकित!
- स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यामुळेच मी राज्याचा मंत्री झालो- शंकरराव गडाख
- भाजपने सत्तेचे गड जिंकले मात्र एनडीए मधील ‘दोन सिंह’ मात्र गमावले; शिवसेनेचा भाजपवर घणाघात


