Share

महानगरपालिकेची निवडणूक औरंगाबादेत कॉंग्रेस स्वबळावर लढवणार ?

Published On: 

औरंगाबाद – भिन्न विचारसरणी असलेल्या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत पुरोगामी विचारसरणी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे पक्ष एकत्र आले. या तिन्ही पक्षांची राजकारण करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याने नेहमी खटके उडत असतात.

या पार्श्वभूमीवर आगामी औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक यंदा लक्ष्यवेधी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने परिस्थिती सामान्य होऊ शकते. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल.

सर्वसाधारणपणे हे तिन्ही पक्ष एकत्र येवून निवडणूक लढवतील असा अंदाज बांधला जात असताना कॉंग्रेसने मात्र स्वबळावर निवडणूक  लढविण्याचे संकेत दिले आहेत.  काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली.महाविकास आघाडीतील पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिल्यापासून स्वतंत्रपणे लढतात. त्यामुळे काँग्रेस औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणुकही स्वबळावर लढेल, असे अमित देशमुख म्हणाले आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाही पक्षाने निवडणूक स्वबळावर लढावी, असा आग्रह आहे. आम्ही त्यांच्या मताचा आदर करायचे ठरवले आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले. Tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान,अनेक वर्षे सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेनेकडून म्हणावा तितका या शहराचा विकास झालेला नसल्याचे चित्र आहे. लोकांमध्ये सेनेबद्दल नाराजी वाढत आहे . कॉंग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्ष आणि संघटना वाढीसाठी कॉंग्रेसचा हा निर्णय योग्य असला तरीही या निर्णयाचा फायदा भाजप तसेच एमआयएमला देखील होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!