Share

कैदेतून सुटका होताच मेहबुबा मुफ्ती यांनी ओकली पुन्हा गरळ,म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- कश्मीरमधील कलम 370 हटविण्याच्या मुद्दय़ावरून माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती केंद्र सरकार विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. मंगळवारी रात्री कैदेतून सुटका होताच त्यांनी लढाई सुरूच राहील. जे हिसकावले ते परत मिळवणार, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.

केंद्र सरकारनं जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देण्याचं कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जम्मू व काश्मिरातील अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. माजी मेहबुबा मुफ्ती यांनाही प्रशासनानं ताब्यात घेत नजरकैदेत ठेवलं होतं. अखेर मंगळवारी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्या मुलीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही जम्मू काश्मीर प्रशासनानं त्यांना मुक्त केलं.

त्या पुढे म्हणाल्या,’५ ऑगस्ट २०१९ या काळ्या दिवशी घेण्यात आलेला निर्णय माझ्या ह्रदयावर घाव घालत राहिला. मला विश्वास आहे की, अशीच परिस्थिती जम्मू काश्मीरमधील लोकांची असेल. जनता तो विसरणार नाही. आता आपल्याला निर्धार करावा लागेल की, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीनं बेकायदेशीरपणे जे हिसकावून घेतलं, ते परत घ्यावं लागेल. असा इशारा मुफ्ती यांनी मोदी सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!