Share

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?- चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई- कॅगने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा,खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी (open enquiry) करण्याचे काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले

यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाच्या अनुषंगाने चर्चा झाली तसेच कॅगचा अहवाल आणि सरकारकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून खुली चौकशी करावी यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.दरम्यान चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. यामध्ये जनतेचाही सहभाग होता, तर मग जनतेची ही चौकशी करणार का? जलयुक्त शिवार योजनेबाबत सरकार कोणाचीही चौकशी करू शकतं. मात्र त्यातून चांगली कामं झाली आहेत याचा विसर पडता कामा नये,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तर दुसऱ्या बाजूला जलयुक्त शिवार प्रकरणी कॅगच्या अहवालात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही तर सूचना केलेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारला फक्त राजकारण करायच आहे आणि त्यामुळे सरकार एसआयटी मार्फत चौकशी करत असुन त्यांच्या चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!