Share

भाजप नेत्यांच्या करंटेपणामुळे पुण्यातील नागरिकांना लसींना मुकावं लागतंय; काँग्रेसचा आरोप

Published On: 

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात ७ हजारांच्या आसपास रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदवण्यात आली होती. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक होता. यामुळे सर्वाधिक कोरोना लसीकरण या जिल्ह्यात आणि शहरी भागात करण्यात यावे अशी मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केली होती.

पुणे महापालिकेने देखील थेट सीरम इन्स्टिट्यूटने पुण्याला अधिक लस पुरवावी अशी मागणी केली होती. आता संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी अधिकाधिक लसीकरण होण्याची गरज असतानाच पुण्याला अधिक लस उपलब्ध करून देण्यासाठी सीरमने आधीच तयारी दर्शवल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी सांगितले असून मोदी सरकारने यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचा खुलासा देखील केला आहे.

या खुलास्यानांतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘कोविशिल्ड लसीचे जादा डोस पुण्याला देण्याची सिरम इन्स्टिट्यूटची अजूनही तयारी आहे. पण, भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या करंटेपणामुळे जादा डोसला मुकावे लागत आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच, ‘पूनावाला यांचे तरी ऐकूण भाजपचे स्थानिक नेते हलतील का?’ असा सवाल देखील मोहन जोशी यांनी उपस्थित केला आहे.

पुनावाला काय म्हणाले होते ?

‘पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही,’ असं सायरस पूनावाला यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी कोरोना काळात मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचे कौतुक देखील केले. यासोबतच, ‘आता पुन्हा पुन्हा लोकडाऊन नको,’ अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी काल हे भाष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!