Share

मोदीजी अभिनंदन ! तुम्ही आता तर रुपयालाही ‘मार्गदर्शक मंडळात’ पोहोचवलं आहे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – आधी आर्थिक विकासाची गती मंदावत असतानाच आता बँक घोटाळे समोर येत आहेत. तसेच जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. तसेच जगभरात मंडवणारा विकास गती हा देखील चिंतेचा विषय झाला आहे.

भारतीय भाग भांडवल बाजारात आज मुंबई सेनसेक्समध्ये  तब्बल २७०० अंकांनी आपटी खाल्ली . गुंतवणूकदारांचे तब्बल ११ लाख कोटी बुडाले आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

आपल्या ट्वीटरवर आणि पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे. शेअर बाजारात २७००  अंकांची घसरण झाली, जी आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण आहे.गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी रुपये बुडाले.’ असंही सुरजेवाला म्हणाले.

 

 

तसेच, ‘भारताच्या अर्थव्यवस्थेला अर्थव्यवस्थेचा कोरोना झाला आहे, परंतु अर्थमंत्री आणि पंतप्रधान गप्प बसले आहेत! मोदीजी तुम्ही म्हणायचे, रुपया पडतो कारण देशात भ्रष्टाचार आहे. आज रुपया ७४.७८ इतका सर्वात कमी किमतीवर आहे. हे व्यापक भ्रष्टाचार प्रतिबिंबित करत नाही?’ असा सवाल मोदींना केला आहे.

 

मोदीजी अभिनंदन. १  अमेरिकी डॉलर = ₹ ७५.१६  . तुम्ही आता तर रुपयालाही “मार्गदर्शक मंडळा”त पोहोचवल आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!