Share

काँग्रेस-शिवसेना उमेदवाराला पडली समान मतं; अखेर चार वर्षाच्या मुलीने ठरवला निकाल

Published On: 

अकोट – राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय.सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान,अकोट तालुक्यातील अकोलखेड पंचायत समिती गणातून ईश्वरचिठ्ठीने विजयी उमेदवार ठरवण्यात आला. या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना उमेदवाराला समान मतं मिळाली होती. काँग्रेसकडून दिगंबर पिंप्राळे आणि शिवसेनेकडून सूरज गणभोज निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी दोघांमध्ये चुरशीची लढत झाल्याचं पहायला मिळालं.

दोघांनाही समान मतं मिळाली असल्याने ईश्वरचिठ्ठीने विजयी उमेदवार ठरवण्याचा निर्णय घेण्यात आली. चार वर्षाच्या मुलीच्या हातून ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली असता शिवसेनेचे सूरज गणभोज याचं नाव आलं. यानंतर त्यांनी विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं.

दरम्यान, मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!