टीम महाराष्ट्र देशा : नागपुरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळावाच्या सुरुवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. त्यानंतर स्वयंसेवकांनी पथसंचलन आणि इतर कवायतींचं प्रात्यक्षिकं दाखवली. यानंतर मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच लिंचिंग हा शब्दच भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. यावर कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन सावंत यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, जातीभेदविरोधी संघटना आहे, आरक्षणाला पाठिंबा देणारी संघटना आहे, संविधानाचा आदर करणारी संघटना आहे, तिरंग्याचा आदर करणारी संघटना आहे, असं म्हणणं जितकं खोटं आहे. तितकंच आरएसएसचा मॉब लिंचिंगशी संबंध नाही आणि देशात मंदी नाही असं मानणे खोटे आहे. देशात ज्या मॉब लिंचिंगच्या घटना घडत आहेत, त्या आरएसएसच्या विचारामधूनच घडत आहेत असं सावंत म्हणाले आहेत.
दरम्यान, मोहन भागवत यांनी ‘अर्थव्यवस्थेविषयी नकारात्मक चर्चा करून वातावरण आणखी गढूळ होते. तसेच विकासदर शून्य टक्क्याच्या खाली गेल्यानंतर मंदी येते, आपला विकासदर अजूनही पाच टक्के देशाचा विकास होतोय, पण ठराविक काळानंतर अर्थव्यवस्थेत गतिरोधक येतात असं भागवत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181510347666051072?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181503753347719169?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181493851111993344?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

