टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठ विधान केले आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन यांनी विधासभा निवडणुकीविषयी बोलताना आघाडीचे केवळ ४० आमदार निवडून येतील अस विधान केले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या या परिस्थितीला अंतर्गत कलह जबाबदार असल्याचही महाजन म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षांतर व इतरही अनेक गोष्टींवर भाष्य केले.

पुढे बोलताना त्यांनी ‘शरद पवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना नाराज केल्याने ते आमच्याकडे आले तसेच भाजपमध्ये आलेले नेते विनाअट पक्षात आले आहेत असंही महाजन म्हणाले. यावेळी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.
दरम्यान, आज भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
दानवेंमुळे अर्जुन खोतकर पुन्हा अडचणीत
फक्त ४ नाही तब्बल ५० आमदार भाजपच्या संपर्कात : महाजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

