टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या आगमनाने अर्जुन खोतकर यांचे नाव उमेदवारी यादीतून पिछाडीवर पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजू वैद्य यांचे नाव आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी झालेल्या दानवेंच्या एन्ट्रीमुळे अर्जुन खोतकर धोक्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर आणि जालन्याचे खा. रावसाहेब दानवे यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे हे मतभेद दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांना औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमदेवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र आता अंबादास दानवे यांचे नाव आघाडीवर आले आहे.
अंबादास दानवे यांच्या येण्याने अर्जुन खोत यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दानवे – खोतकरवाद जोर पकडण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीवेळी रावसाहेब दानवेंनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून रावसाहेब दानवे आणि खोतकरांच्यात जुंपणार असल्याचं दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

