Share

कॉंग्रेसच्या एकमेव खासदाराचा सरकारला घरचा आहेर

Published On: 

चंद्रपूर: राज्यात कोरोनाच्या (Corona) रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने राज्यसरकारने आवश्यक ते पावले उचलत कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र सरकारने लागू केलेल्या या नियमांना काही लोकांकडून विरोध होत आहे. विशेष म्हणजे सरकारमधील काही नेत्यांकडून देखील याचा विरोध केला जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे एकमेव खासदाराने राज्यसरकारवर टीका करत सरकारला घरचा आहेर दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Congress MP Balu Dhanorkar) यांनी सरकारवर जोरदार टीका करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही अपयशी ठरले आहेत. लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोस घेत राहायचे का, असा सवाल करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दोन वर्षांच्या कालखंडात राज्य आणि केंद्र सरकारने कुठल्याच निश्चित उपाययोजना केल्या नाहीत, असे बाळू धानोरकर म्हणाले आहेत.

शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरदेखील बाळू धानोरकर यांनी टीका केली. तसेच राज्यातील सर्व पर्यटन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची मागणी केल्यामुळे धानोरकर चर्चेत आले होते. आता कोरोनाच्या नियमांवरून सरकारवर जोरदार टीका केल्याने आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!