Share

प्रियंका गांधींचा ‘यूपी अजेंडा’ जाहीर; महिलांसंदर्भात केले मोठे विधान

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी कॉंग्रेसचा जाहीरनामा देखील जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी अनेकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी समाजवादी पक्ष त्याच सोबत कॉंग्रेस देखील मोर्चेबांधणी करताना दिसत आहे.

प्रियंका गांधी कार्यक्रमात बोलत असताना म्हणाल्या, काँग्रेसने महिलांना पंचायततीत ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांच्या सक्षमीकरणास सुरुवात केली होती. जेव्हा सत्तेत महिलांचा सहभागच नव्हता. त्याकाळात काँग्रेसने देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली, असं म्हणत त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण करून दिली. शक्ती, संकल्प, करुणा, दया आणि साहस हे महिलांचे गुण असतात. हेच गुण राजकारणातही यावेत, अशी इच्छा प्रियंका गांधी यांनी बोलून दाखवली.

पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत जर कॉंग्रेस सत्तेवर आली तर महिलांना नोकरीमध्ये ४० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचं प्रियंका गांधी यांनी जाहीर केलं आहे. या निवडणूक अजेंड्यातून महिला सक्षमीकरणाला मदत मिळेल. देशातील ६० टक्के महिला राजकारणात आल्या तर राजकारणाचा चेहरामोहरा बदलून जाईल, अशी अशा देखील प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!