Share

‘सत्ता मिळविण्यासाठी भाजपा काँग्रेस आमदारांना प्रलोभनं दाखवतंय’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या विधानसभेची मुदत आज संपणार असून सरकार स्थापनेबाबतचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. भाजप-शिवसेनेमध्ये तिसऱ्या कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव घेऊन येणार असाल तरच भाजपाशी चर्चा होईल अस ठाम प्रतिपादन त्यांनी केलं.

महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असंच म्हणावं लागेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसंच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हटले आहेत.

दरम्यान आता शिवसेनेपाठोपाठ कॉंग्रेसने देखील भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा सध्या जे करतंय ते घटनाबाह्य आहे. भाजपा काँग्रेस आमदारांना प्रलोभनं दाखवतंय, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.तसेच भाजपाच्या वेळकाढू पणामुळे जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर त्याला भाजपाच जबाबदार असेल असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले, शिवसेना म्हणतेय ते खर आहे. भाजपाकडून फोडाफोडीच राजकारण होतंय. हे खरंय की भाजपा नेते आमच्या आमदारांना फोन करुन संपर्क करीत आहेत. आमचे ४४ शिलेदार एकाच ठिकाणी आहेत. आज ते संपर्क करीत आहेत उद्या धमकावतील आणि बळजबरी देखील करतील. याची आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192670085216817158?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192683292845199360?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192688401457135617?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!