मुंबई : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असून, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला असून, त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले आहे. या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झालीय, मात्र त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून उद्या आपण जहांगीर रुग्णालयात भेट देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आज जहांगीर रुग्णालयात जाऊन थोरात यांचा प्रकृतीची विचारपूस केली. ‘माझी आत्ता डॉक्टरांशी चर्चा झाली नाही. मात्र वर्षा गायकवाड या इथेच आहेत. त्यांची डॉक्टरांशी चर्चा झालेली आहे. सातव नॉर्मल वर येत होते. पुन्हा थोडा त्रास झालेला आहे.पण ते लवकरच बरे होतील’. अस बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच सताव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आता त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांची तब्बेत खालावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अवैध वाळू उपसा; पोलिसांच्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त
- बाप रे!! निधीच्या ‘कोको’ला शोधून दिल्यास १ लाख रुपये मिळणार
- आमीर खानने ‘रंगीला’ चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ‘या’ कारणांमुळे केले नव्हते काम
- ‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है…’
- ‘वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाम में बिकता तेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

