🕒 1 min read
Devendra Fadanvis | मुंबई : टाटा एअर बस प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यावर काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना आव्हान दिलं आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भाजपकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे पण त्याचे खापर मात्र महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वेदांता व वेदांता- फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत पण फडणवीसांकडून याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं लोंढे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत वेदांताच्या गुंतवणुकीसंदर्भात खोटी माहिती दिली. वेदांताचा प्रकल्प फडणवीस यांच्या काळातच आला आणि गेला, तो प्रकल्प मोबाईलचा होता तर वेदांता-फॉक्सकॉन हा 1 लाख 56 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व 1 लाख रोजगार निर्माण होणारा प्रकल्प होता, हा प्रकल्प सेमी कंडक्टरचा होता, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात पक्षीय राजकारण न करता जास्तीत जास्त गुंतवणूक व जास्त रोजगार आणले पाहिजेत, यासाठी विरोधी पक्षही सरकारला मदत करण्यास तयार आहे पण भाजपाचे राजकारण हे धर्मावर व श्रेय लाटण्याचे राजकारण आहे. तसेच 12 कोटी जनतेला धोका कसा द्यायचा हेच भाजपा व फडणवीस यांचे राजकारण आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो, असा घणाघात त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shinde-Fadanvis | राऊत जखमी ; शिंदे-फडणवीसांचा ‘तो’ निर्णय आणणार का त्यांनाच अडचणीत?
- IND vs BAN T20 | केएल राहुलच्या खेळीचे श्रेय विराटला, सरावादरम्यान चर्चा! अन् जबरदस्त अर्धशतक
- Sanjay Raut । राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; जामीन याचिकेवर ९ नोव्हेंबरला निकाल
- Bhagatsingh Koshyari | “आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षाही जलदगतीने विचार येतात”
- IND vs BAN T20 | जबरदस्त अर्धशतक झळकावल्यानंतर केएल राहुल बाद ; भारताला बसला दुसरा धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
