Share

Sanjay Raut । राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; जामीन याचिकेवर ९ नोव्हेंबरला निकाल

Published On: 

Sanjay Raut । मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर २१ ऑक्टोबरला सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत २ नोव्हेंबरला ठेवली. आता पुन्हा या जामीन याचिकेची सुनावणी ९ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत याआधीही वाढ करण्यात आली. २१ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच गेली. आता ही सुनावणी अजून पुढे ढकलण्यात आली असल्याने संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे. या संदर्भात कोर्ट आज काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!