Share

IND vs BAN T20 | केएल राहुलच्या खेळीचे श्रेय विराटला, सरावादरम्यान चर्चा! अन् जबरदस्त अर्धशतक

Published On: 

IND vs BAN T20 | टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरली आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ दोन धावांवर हसन महमूदच्या खासगी धावसंख्येवर झेलबाद झाला. यावेळी विराट कोहली आणि केएल राहुलने चांगली भागिदारी केली. केएल राहुचा फॉर्म पुन्हा वापस आला आहे. आजच्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले.

केएल राहुलने स्पर्धेतील पहिले अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. केएल राहुलच्या खेळीचे श्रेय विराट कोहलीला देण्यात येत आहे. विराट आणि केएल राहुल यांच्या नेट प्रॅक्टीस दरम्याने केलेच्या चर्चेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाकिब अल हसनने केएल राहुलची विकेट घेतली. त्यानंतर कर्णधार शकीब अल हसनने सूर्यकुमारचा डाव संपवला. सूर्याने १६ चेंडूत ३० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर हार्दिक पांड्या देखील बाद झाला.

केएल राहुल पूर्वी रोहित शर्मा सस्त्यात आऊट झाला आहे. तस्किन अहमदच्या षटकात रोहित शर्माला जीवदान मिळाले होते. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर राहुलने डीप बॅकवर्ड लेगवर चेंडू खेळला, सीमारेषेवर उभ्या असलेल्या हसनला संधी होती पण त्याने सोपा झेल सोडला. या षटकातही एकच धाव आली. त्यानंतर हसन महमूदने आपली चूक सुधारत रोहित शर्माला बाद केले. चौथ्या षटकाला आलेल्या महमूदने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण स्लिपमध्ये यासिर अलीकडे झेलबाद झाला. रोहितने 8 चेंडूत केवळ दोन धावा केल्या.

https://twitter.com/ExposeMSDfan/status/1587728692587139073

भारताने संघात केला मोठा बदल-

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी आपापल्या संघात एक बदल केला आहे. जिथे भारताने दीपक हुडाला बाहेर ठेवत अक्षर पटेलला संधी दिली आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघात सौम्या सरकारच्या जागी शरीफुल इस्लामचा समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशची प्लेइंग -11

नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन, अफिफ हुसैन, नुरुल हसन, मोसाद्देक हुसेन, यासिर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम.

इंडियाची प्लेइंग -11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!