Share

‘मंत्रिमंडळ बदलून काय होणार ? सरकारच बदला…देश वाचेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नव्हता. या विस्तारात ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, सुशील कुमार मोदी, दिलीप घोष, अनुप्रिया पटेल यांच्यासह इतर अनेक चेहरे मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकतात.

मोदींच्या या मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘मंत्रिमंडळ बदलून काय होणार? सरकारच बदला…देश वाचेल..!!’ असा घणाघात भाई जगताप यांनी केला आहे.

दरम्यान, आता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला जात आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये केंद्रीय रासायनिक आणि खते मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि देबाश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.

सन 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिला मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार असेल. आगामी काळात देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर सन 2024 मध्ये लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. हे मुद्दे लक्षात घेवून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!