Share

छ.संभाजी महाराजांना स्त्रियांचा व दारुचा व्यसनी म्हणून बदनामी करणाऱ्या गोळवलकरांचा भाजप निषेध करणार का ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाटील यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ही मागणी केली आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल असून, त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफीवरुनही पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले की, नाचता येईना अंगण वाकडे अशी महाविकस आघाडी सरकारची स्थिती आहे. कर्जमाफीच्या नुसत्या घोषणा असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी काही नाही. सरकारने ३५ लाख जणांची कार्जमाफी करण्याची घोषणा केली, आणि केवळ १५ हजार जणांचीच यादी जाहीर केली. या गतीने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कधी? असा सवालही यावेळी पाटील यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले की, कर्जमाफीसाठी सरकार जर आचारसंहितेचं कारण देत असेल, तर कर्जमाफीसह, थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय रद्द, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय ही थांबवावा लागेल असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

कॉंग्रेसचा पलटवार –

आता कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकरांच्या पुस्तकातील माजुकाराचा दाखला दिला आहे. या पुस्तकात गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला आहे असून भाजप आंनी चंद्रकांत पाटील त्यांचा निषेध करणार का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

याबाबत सावंत आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘छ.संभाजी महाराजांना स्त्रियांचा व दारुचा व्यसनी म्हणून त्यांची खंडो बल्लाळाच्या बहिणीवर वाईट नजर होती अशी त्यांची बदनामी करणाऱ्या गोळवलकरांचा जाहीर निषेध! चंद्रकांत दादा तुम्ही निषेध करणार का? नाही तर संभाजी महाराजांचे नाव घेण्याचा @BJP4Maharashtra ला अधिकार नाही.’

तसेच या ट्विटमध्ये सावंत यांनी गोळवलकरांच्या ‘Power of Devotion’ मधील लिखाणाचा फोटोही दिलेला आहे ज्यात, छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर आहे.

 

आता भाजप आणि चंद्रकांत पाटील यावर काय उत्तर देताय हे बघणं महत्वाचं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!