🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून सैन्य दलाच्या कामगिरीचा फायदा उठवण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसत आहे. भाजपकडून आपल्या सत्ता काळात सर्जिकल स्ट्राईक केल्याचं सांगत प्रचार केला जात आहे. तर आता काँग्रेसने देखील युपीए सत्ताकाळात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या तारखाच जाहीर केल्या आहेत.
काँग्रेसप्रणीत सरकारमध्ये सैन्यादलाला शत्रूंवर कारवाई करण्यासाठी मोकळी सूट होती, त्यामुळे सैन्याने खूप सारे सर्जिकल स्ट्राइक केले आहेत, असा दावा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केला होता. काँग्रेसने सैन्याच्या कामगिरीला कधीही राजकीय रंग दिला नाही. आम्ही सैन्यादलाला त्याचे श्रेय दिले आहे. परंतु आताचे सरकार मतांसाठी सैन्यदलाचे श्रेय स्वतः घेत आहे, ही अतिशय निंदनीय बाब असल्याने सरकारला लाज वाटायला हवी, अशा शब्दात मनमोहन सिंग यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, आता काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या 6 सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली आहे.
कधी झाले काँग्रेसच्या सत्ताकाळात सर्जिकल स्ट्राईक
१ ) 19 जानेवारी 2008,
२ ) 30 ऑगस्ट- 1 सप्टेंबर,
३ ) 6 जानेवारी 2013,
४ ) 27-28 जुलै 2013,
५ ) 6 ऑगस्ट 2013
६ ) 23 डिसेंबर 2013
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

