🕒 1 min read
मुंबई : पुण्यातील चांदणी चौक (Chandni Chowk) येथे होणाऱ्या गर्दीमुळे तेथील पूल पाडण्यात आला आहे. त्या जागेची पाहणी करण्यास गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो काढताना पोज ठरवली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुनच काँग्रेस पक्षाने एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांना काँग्रेस पक्षाचा टोला :
काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शिंदेंचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी शेवटी मोदींचा गुण लागलाच, अशी टीका काँग्रेसने केली आहे. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे पोज देताना दिसत आहेत.
पाहा ट्विट :
शेवटी मोदींचा गुण लागलाच! pic.twitter.com/0VOzFNENGN
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 4, 2022
नितीन गडकरींनी दिली होती माहिती :
पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार चालू असून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) चांदणी चौक परिसरात भेट दिली होती. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आणि पुण्याशी जोडलेले रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. पुण्यातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चाकण एमआयडी पासून 27 मीटर अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क भरण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसी सोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. त्यामुळे पुण्यात जास्त प्रमाणात वाहतुक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक येथील पुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, पुणे ते शिरूर आणि नगर – औरंगाबाद जुन्या रोडवर तीन मजली रस्त्याच्या डिझाईनचं काम चालू आहे. त्याचबरोबर तळेगाव आणि शिरूर हा मार्ग करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई कडून येणारी वाहन वळवता येतील, असे गडकरी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिक संतप्त! बैठकीत वरुण सरदेसाईंना विचारला जाब, काय आहे प्रकरण?
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता 17 ऑक्टोबर पर्यंत येईल शेतकऱ्यांच्या खात्यात
- MNS | “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणण्याआधी…” ; मनसेचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल
- Farming Update | शेतकऱ्यांनी हिवाळ्यात ‘ही’ पिके घेतली तर मिळेल भरघोस उत्पन्न
- “यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नसून…” ; मनसेचा शिंदे-ठाकरेंवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
