🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या सणासुदीच्या दिवसात सर्व क्षेत्रात एम्पलोयी आपल्या बोनसची वाट बघत असतात. त्याचप्रमाणे शेतकरी देखील आपल्या पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची तयारी सुरू करायची आहे. शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
देशातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या आतुरतेने वाट बघत आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर पर्यंत पीएम योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांचे KYC नसल्यामुळे या 12व्या हप्त्याला उशीर होत आहे.
17 ऑक्टोबर रोजी होऊ शकते रक्कम जमा
ऑक्टोबर हा महिना शेतकऱ्यांच्या पीक काढणीचा आणि त्याचबरोबर सणासुदीचा काळ असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती आणि वैयक्तिक खर्चात वाढ होते. अशा परिस्थितीत सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना या महिन्यात मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 17 ऑक्टोबर रोजी पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यातील 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.
KYC अनिवार्य आहे
सरकारच्या या योजनेअंतर्गत रक्कम मिळवण्यासाठी KYC करणे अनिवार्य आहे. पीएम किसान योजनेची KYC करायची अंतिम तारीख कधीच निघून गेली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्याच अकाउंट मध्ये 12वा हप्ता जमा होणार आहे.
यादीमध्ये आपले नाव कसे तपासावे?
पीएम किसान योजनेच्या12 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की ही यादी सतत अपडेट केली जात आहे. कारण KYC नसल्यामुळे या यादीतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यादी सतत तपासावी.
यादी कशी तपासावी :
- https://pmkisan.gov.in/ ही विकृत वेबसाईट उघडा.
- वेबसाईट उघडल्यावर फार्मर्स पोर्टलच्या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडतात त्यामध्ये तुमची राज्य, जिल्हा, ब्लॉग आणि गावाची माहिती भरा आणि त्यानंतर Get Report वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक यादी दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या
- MNS | “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणण्याआधी…” ; मनसेचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल
- Farming Update | शेतकऱ्यांनी हिवाळ्यात ‘ही’ पिके घेतली तर मिळेल भरघोस उत्पन्न
- “यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नसून…” ; मनसेचा शिंदे-ठाकरेंवर घणाघात
- Sanjay Raut | संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच होणार, न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ!
- New Car Launch | Aston Martin ची ‘ही’ नवी कार बाजारात लाँच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
