मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) शिवसेनेचे दोन्ही गट शक्तीप्रदर्शन करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena party chief Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून ५ ऑक्टोबरला मुंबईत स्वतंत्र दसरा मेळावा आयोजित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर होणार आहे. या मेळाव्यापूर्वी शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्याच्या आढावा बैठकीत शिवसेनेचे विभागप्रमुख आणि युवा सेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. यावेळी शिवसैनिकांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Yuva Sena Secretary Varun Sardesai) यांना जाब विचारला.
शिवसेनेचा दसरा मेळावा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी शिवसेना (Shiv Sena) मैदानात उतरली आहे. मेळाव्यापूर्वी बैठकांचे सत्र सुरु आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम(Yogesh Kadam) हे शिंदे गटात गेले आहेत. तरीदेखील त्यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) युवासेना कार्यकारणीच्या कोअर कमिटीवर आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये वाद झाला. सिद्धेश कदम हे युवासेना कार्यकारणीच्या कोअर कमिटीवर कसे काय? असा सवाल विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आणि आमदार विलास पोतनीस यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई व सुरज चव्हाण यांना विचारला. यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले.
शिवसेनेतील वादामुळे चर्चेला उधाण-
या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. यांच्यासमोर हा वाद झाला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन सिद्धेश कदम यांच्याबाबत निर्णय घेणार असल्याचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान शिवसेनेतील या वादामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचे लक्ष-
दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी जोरात तयारी सुरु केली आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते उद्या मुंबईत असतील. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडणार नाहीत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेते काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसैनिक सिद्धेश कदमवर नाराज का?
रामदास कदम आणि योदेश कदम हे सतत शिवसेनेवर उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. रामदास कदम यांनी तर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत देखील वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. त्यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटीवर असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणण्याआधी…” ; मनसेचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल
- Farming Update | शेतकऱ्यांनी हिवाळ्यात ‘ही’ पिके घेतली तर मिळेल भरघोस उत्पन्न
- “यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नसून…” ; मनसेचा शिंदे-ठाकरेंवर घणाघात
- Sanjay Raut | संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच होणार, न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ!
- New Car Launch | Aston Martin ची ‘ही’ नवी कार बाजारात लाँच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

