टीम महाराष्ट्र देशा- ‘ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सगळेच महत्वाचे नेते आणि देशभरातील साधू – संत – महंत प्रभू श्रीरामाच्या भक्तिमय वातावरणात रंगले होते.त्याचवेळी मात्र धुळ्यात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य बोकडाच्या मटणावर ताव मारण्यात गुंतलेले होते ‘ हा सगळाच प्रकार दुर्दैवी असल्याचे मत धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी ‘ महाराष्ट्र देशा ‘ सोबत बोलतांना व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर असणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या दिवशी सबंध देश भक्तिमय वातावरणात रंगलेला होता.त्यातल्या त्यात हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासाचा हा महिना असतांना धुळ्यात मात्र चमचमीत पार्टी रंगत होती.
काल धुळ्यात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होती. या सभेला उपस्थित असणाऱ्या भाजप नेत्यांसाठी आणि पदाधिकऱ्यांसाठी धुळ्यातल्या गोंदुर गावातील ‘ साई लक्ष्मी लॉन्स ‘ या ठिकाणी चक्क तीन बोकड मारण्यात आले होते. लॉन्स संचालकांनी आज अशा एतिहासिक दिवशी आणि श्रावण महिन्यात आपण डायनिंग हॉल मध्ये मटण पार्टीला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर या सदस्यांनी लॉन्सच्या गेटला लागून असलेल्या शेताच्या झोपडीत मटणावर ताव मारला असल्याचे उघड झाले आहे.
या मटण पार्टीत जवळपास १५० लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. ऐन श्रावण महिन्यात आणि प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी आमच्या लोकप्रतिनिधींनी ‘ बोटीसाठी चव सोडली ‘ असल्याची चर्चा देखील जिल्ह्यात होत आहे.कालच्या मटण पार्टी प्रकारामुळे धुळ्यात सर्वत्र भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी छी – थू होते आहे. या सगळ्या प्रकारावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी भाजपच्या नेत्यांना, जिल्हा परिषद सदस्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण राम आपल्या सगळ्यांच्या मनात!: पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘आपली मुंबई सुरक्षितच आहे’, नाव न घेता सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

