टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यातच मतदारांना प्रभावित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच अनेकजण वादग्रस्त विधान करून चर्चांना उधाण आणत आहेत. याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे आता छत्तीसगढमधील काँग्रेसचच्या उमेदवारांने पंतप्रधान मोदींना फासावर लटकवण्याचे वक्तव्य केले आहे. छत्तीसगडमध्ये रायगड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले काँग्रेसचे उमेदवार ?
काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २३ मे ला फासावर लटकवणार असल्याचे म्हटले. एका प्रचारसभेला संबोधित करताना राठिया यांनी कुनकुरी विधानसभेच्या नारायणपूरमध्ये हे वक्तव्य केले होते. त्यांचे हे भाषण सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे आता पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

