🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेपाठोपाठ आता महाराष्ट्र काँग्रेसचाही एक गट भाजप पक्षात संपर्कात आहे. काल (गुरुवारी) सायंकाळी भाजपचे समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या घरी दोन माजी मुख्यमंत्र्यांची भेट झाली. यामध्ये काँग्रेसचे एक दिग्गज अशोक चव्हाण आणि दुसरे भाजपचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात १५ ते २० मिनिटे बैठक झाली. अशोक चव्हाण आणि फडणवीस या दोघांनीही भेट घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र दोघांनीही राजकीय चर्चा झाल्याचा नकार दिला. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय लवकर घ्यावा-
आठवले म्हणाले, “काँग्रेस हा बिघडणारा पक्ष आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडली. बडे नेतेही असमाधानी असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण हे हुशार नेते आहेत. शंकरराव चव्हाण यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय लवकर घ्यावा. मराठवाड्याच्या विकासासाठी हे चांगले होईल. मी म्हणतो की टू थर्ड शिवसेना भाजपसोबत आली आहे. आता टू थर्ड काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आले पाहिजे. फक्त राज ठाकरेंचा पक्ष मनसे नको यायला.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. याआधी महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर देखील रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज यांना एकत्र आणण्यात भाजपला फटका बसणार-
रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरे यांच्या पक्षाशी युती केल्यास उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदार नाराज होतील. दलित समाजाच्या मनातही गैरसमज निर्माण होऊ शकतात. शिवसेनेला पर्याय म्हणून राज ठाकरेंच्या मनसेकडे पाहिले जात आहे. पण आता गरज काय? शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे आणि ती आज भाजपसोबत आहे.अशा स्थितीत राज यांना एकत्र आणण्यात भाजपला फटका बसणार आहे.”
राज ठाकरेंना लोक मत देत नाहीत-
रामदास आठवले म्हणाले, ‘राज ठाकरे हे तसे मोठे नेते आहेत. ते मोठ्या सभा घेतात. त्यांच्या सभांनाही खूप गर्दी जमते. पण गर्दीत आलेले लोक त्यांना मत देत नाहीत तेव्हा याचा काय उपयोग. अशा स्थितीत भाजपला त्यांच्याशी युती करून काही फायदा होणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackrey | आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा मोठा झटका, वरळीत शिंदेची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
- Chandrashekhar Bawankule | एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढेल – चंद्रशेखर बावनकुळे
- “BJP ला राज ठाकरेंची गरज नाही, नुकसान होईल”, शहांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी केंद्रीय मंत्र्याचा इशारा
- MNS । दसऱ्याला आपण प्रत्येक हिंदूला आणि मराठी माणसाला मार्गदर्शन करावे; मनसैनिकांची राज ठाकरेंना विनंती
- Ashok Chavan | अशोक चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीचं दिलं स्पष्टीकरण, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
