🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नंतर आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही भेट भाजपच्या प्रवक्त्याच्या घरी झाली असून यामुळे राजकीय चर्चेंना उधाण आलं आहे.
अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेटः
भाजप नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी अशोक चव्हाण गेले असता तिथं देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होतो. यावेळी चव्हाण आणि फडणवीस यांची दाराआड राजकीय चर्चा झाली असल्याचं समोर आलं आहे. मात्र, त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप गुपित आहे.
काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार?
अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीमुळे चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशोक चव्हाण यांनी या भेटीची तबुली दिली असून या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिली आहे. याआधी देखील या चर्चेला प्रचंड उधाण आलं होतं. मात्र, या भेटीमुळे आता काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेना पाठोपाठ आता काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या माजी मंत्रीच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाला देखील मोठा फटका बसणार आहे का, हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Ravi Rana | अमरावतीत हत्येच्या घटनेनंतर रवी राणा संतप्त
- Ashok Chavan | अशोक चव्हाण यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट! चर्चेला उधाण, काँग्रेसचे आमदार फुटणार?
- शिंदे गटातील आमदार अडचणीत; बोगस डॉक्टर डिग्री प्रकरणात कारवाई होणार का ?
- Amol Mitkari | “रूपाली चाकणकर आहेत तरी कुठे?” अमोल मिटकरी प्रकरणावरुन भाजपचा सवाल
- Deepak Kesarkar | शाळेमध्ये नोंद आणि शिक्षण मदरशामध्ये ; मंत्री दीपक केसरकर कारवाई करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
