🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा हक्काचा गड मानला जातो. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याकडे या मतदारसंघाच्या प्रतिनिधीत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याच मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एन्ट्री घेतली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची धडकः
वरळीतल्या अनेक सेना पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. वरळीतल्या सेना पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक पार पडली असून लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सचिन अहिर यांची प्रतिक्रीयाः
शिवसेना नेते सचिन अहिर यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने वरळीमध्ये स्वबळावर निवडणुक लढवली होती. मात्र, त्यांना एकही जागा मिळाली नसून भाजपचे सर्व उमेदावर तिसऱ्या क्रमांकावर होते, तोच केविलवाणा प्रयत्न आता पुन्हा होतोय, त्यामुळे मोठा फरक पडेल असं वाटत नसल्याचं सचिन आहिर यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्याः
- “BJP ला राज ठाकरेंची गरज नाही, नुकसान होईल”, शहांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी केंद्रीय मंत्र्याचा इशारा
- MNS । दसऱ्याला आपण प्रत्येक हिंदूला आणि मराठी माणसाला मार्गदर्शन करावे; मनसैनिकांची राज ठाकरेंना विनंती
- Ashok Chavan | अशोक चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीचं दिलं स्पष्टीकरण, म्हणाले..
- Ravi Rana | अमरावतीत हत्येच्या घटनेनंतर रवी राणा संतप्त
- Ashok Chavan | अशोक चव्हाण यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट! चर्चेला उधाण, काँग्रेसचे आमदार फुटणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
