मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार, आमदार आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. आज पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली त्यावेळी त्यांनी म्हंटले, ‘ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
https://twitter.com/NCPspeaks/status/1419624992027729922
पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरूण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणे व त्यांचे चिरंजीव ट्वीट करुन जी भाषा वापरत आहेत ते योग्य नाही – मलिक
- उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ६१ किलोंचा मोदक अर्पण
- उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ६१ किलोंचा मोदक अर्पण
- मीराबाई चानुला मिळू शकतं सुवर्ण पदक, डोपींग चाचणी नंतर होणार निर्णय
- ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पदकाची आशा कायम


