उस्मानाबाद : ती तोट्यात जाते असे सतत बोलले जाते. पण तसे पाहिले तर शेती नवनवीन आयडियाने पिकविली तर शेतकरी लाखोंमध्ये फायदा कमवू शकतात. शेती व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय केला तर शेतकरी दुप्पट पैसा कमवू शकतो. अशाच एका दुग्ध व्यवसाय करून दुप्पट पैसा कमविणाऱ्या शेतकऱ्याची कहाणी पाहणार आहोत.
उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे राहणारे सतीष खडके यांनी बक्कल पैसा कमवून आसपासच्या शेतकऱ्यांच्या नजरा उंच केल्या आहेत. सतीष खडके या शेतकऱ्याने जोड व्यवसाय करायचा ठरवून त्यांनी HF म्हणजेच होल्सटीन फ्रिसियन या जातीच्या गाईंचा सांभाळ केला आणि दुग्ध व्यवसाय करणार असा निर्धार केला. मागच्या ४ वर्षात त्यांनी हा व्यवसाय सफल करून दाखवला. फक्त ६ गायींचा सांभाळ करून महिन्याला तब्बल दीड लाखांचे उत्पन्न घेत आहेत. वाघोली शिवारातील या शेतकऱ्याच्या मेहनतीला कौतुकाची थाप मिळत आहे. ४ वर्षात गायींची संख्या वाढली आहे तसे उत्पन्नही दुप्पटीने वाढले आहे असेही सांगितले.
नियोजन असे केले –
सर्वात पहिल्यांदा पंजाबमधून होल्सटीन फ्रिसियन या जातीच्या ६ गायी देशात आणल्या. ६ लाख रुपये गुंतवणूक व २ लाख रुपयांचे शेड असा मिळून ८ लाख रुपयांचा सुरुवातीला खर्च केला. ४ वर्ष हा व्यवसाय पुढे नेत आज महिन्याला दीड लाख रुपये कमवत आहेत. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायींना त्यांनी सकस आहार दिला. खर्च आणि वेळ सुरुवातीला खर्च केला आता यातून त्यांना चांगला फायदा होत आहे.
गायींचे खाद्य –
मुरघास, ज्वारी कडबा, हरभरा भूसकट, पेंड, सरकी, सुपर निपिअर इ खाद्य त्यांनी गायींना देऊन महिन्याला ५० हजारांचा खर्च केला. दुधाला चांगला दर म्हणजे २५ ते २८ हा मिळत आहे. हा शेतकरी वर्षाला दुधापासून आणि शेणखतापासून तब्बल ७ ते ८ लाखांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

