नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाचे नेते मोहम्मद शाहबुद्दीन यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, चुकीच्या माहितीमुळे गोंधळ उडाल्याचं नंतर स्पष्ट झालं. शाहबुद्दीन यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त देण्यात आले होतं. मात्र, ते वृत्त चुकीच्या माहितीमुळे दिल्या गेल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
मोहम्मद शाहबुद्दीन तिहार जेलमध्ये हत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मोहम्मद शाहबुद्दीन याला मंगळवारी रात्री दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातच शाहबुद्दीनचं शनिवारी सकाळी निधन झाल्याचं वृत्त ‘एएनआय’च्या हवाल्याने अनेक प्रसारमाध्यमांनी दिलं.
दरम्यान, शाहबुद्दीनची प्रकृती गंभीर आहे, मात्र तो जिवंत आहे, असा दावा तिहार तुरुंग प्रशासनाने केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोष्टी अफवा असल्याचं तिहार तुरुंगाच्या डीजींचं म्हणणं आहे. त्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेने आधीचा ट्वीट डिलीट करत सुधारणा केली. राजद प्रवक्ते आणि शाहबुद्दीनच्या कुटुंबीयांनी तशी माहिती दिल्याचं सांगत एएनआयने दिलगिरी व्यक्त केली आहे.
CORRECTION | Tweet deleted as awaiting official confirmation. Conflicting information was provided to us from family members and RJD spokesperson confirming his passing away. Error regretted. pic.twitter.com/WMcnUD2Oou
— ANI (@ANI) May 1, 2021
२००४ मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात शाहबुद्दीन यांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. वसूलीचा पैसा न दिल्याने दोन भावांची हत्या करण्यात आल्याची ही घटना होती. मोहम्मद शाहबुद्दीन यांचा बिहारमध्ये दबदबा होता. ते दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार राहिलेले आहेत.
- शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा
- आरसीबीच्या प्रमुख शिलेदारांना बाद करत हरप्रित ब्रारने रचला ‘हा’ विक्रम
- ‘कोरोनाच्या संकटात सरकार मदत करू शकत नाही,मला आमदार असण्याची लाज वाटतेय’
- लता मंगेशकर यांचे एक पाऊल पुढे ; मुख्यमंत्री सहायता निधीला केली 7 लाखांची मदत
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अचानक शीसगंज साहेब गुरुद्वाराला भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

