Share

कर्करोगाशी झुंज देत चित्रीकरण केले पूर्ण; मांजरेकरांचा खुलासा

Published On: 

मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर स्लिम आणि फिट पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. कर्करोगाशी झुंज देत चित्रीकरणा दरम्यान आलेल्या अनुभवाचा खुलासा केला.

काही महिन्यांपूर्वी मांजरेकरांना मूत्राशयाच्या कर्करोगाची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांची केमोथेरपी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे जवळपास ३५ किलो वजन कमी झाले. महेश म्हणाले, जेव्हा चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण सुरु होते. तेव्हा त्यांना कर्करोग असल्याचे कळले. मात्र, दोन महिन्याच्या केमोथेपरी नंतर आज त्यांच्या कर्करोगाचे निदान झाले आहे.२ महिन्याच्या केमोथेरपी विषयी बोलतांना महेश म्हणाले, चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान केमोथेरपी सुरु होती. त्यानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. जेव्हा मला कळलं की मला कर्करोग आहे. तेव्हा मला कोणताही धक्का बसला नव्हता. कारण मला माहित आहे की असे बरेच लोक आहेत, ज्यांना कर्करोगवर लढा दिला आणि  विजय ही  मिळवला. यादरम्यान सलमान आणि आयुषने त्यांच्या कर्करोगाच्या लढ्यात साथ दिल्याचं ही व्यक्त केले.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री महिमा मकवाना ही ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून यात सलमान एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. तर आयुष एका खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!