नाशिक: आरोग्य भरतीच्या परीक्षांचा गोंधळ सर्वांनाच माहीत आहे. दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची परीक्षा २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. न्यासा या खासगी संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेपूर्वी गोंधळ सुरू झाला होताच मात्र ऐन परीक्षेच्या दिवशी सुद्धा परीक्षा केंद्रांवर गोंधळ बघायला मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर परिकशेतील तक्रारींचे निराकरण झाल्यावरच नियुक्त्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
न्यासा संस्थेने निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाने या उमेदवारांना येत्या ७ डिसेंबरच्या आत नियुक्त्या देण्याची तयारी सुरू केलीय. मात्र या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्या आहेत. खरंच पेपर फुटला होता का, एवढा गोंधळ झाला त्यावर काहीच कारवाई का नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळाली नाहीत. यावर आरोग्य मंत्री टोपे यांनी नियुक्त्यांबाबत पारदर्शक प्रक्रिया राबणार असल्याचे म्हटले आहे.
आरोग्यसेवा आयुक्त आणि संचालक यांच्या देखरेखीखाली नियुक्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. परीक्षेत गोंधळ झाला, तक्रारी आहेत, त्यांचे निराकरण केल्याशिवाय नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत. ज्यांना काही परीक्षेबाबत तक्रारी असतील त्यांनी आरोग्यसेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी आणि संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल
- न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतरही कर्णधार रोहित नाखूष; म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

