Share

बंजारा समाजाची बदनामी प्रकरणी भाजप आमदाराविरोधात तक्रार

Published On: 

बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप बीड येथील समाजातील नेत्यांनी केला होता. याबाबत त्यांनी माध्यमांसमोर आपली भुमिका स्पष्ट केली होती. मात्र, यानंतर आता बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील बंजारा समाजातर्फे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातलखकर यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समाजाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पुजा लहू चव्हाण या युवतीने पुण्यात आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान आ.अतुल भातखलकर यांनी बंजारा समाजाच्या भावना दुखावतील (राठोडगिरी) असे अश्लील आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला. यामुळे बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील बंजारा समाजाच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला आहे. यावेळी बाळासाहेब चव्हाण, विजय राठोड, प्रकाश चव्हाण, डी.एस.राठोड, कुंडलिक राठोड, विकास पवार, नरेश राठोड, करण पवार, पंडित जाधव, रविराज राठोड आदी उपस्थित होते.

दरम्यान, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची बैठक रविवारी पार पडली आहे. यावेळी पूजा चव्हाण संशयित मृत्यू प्रकरणात विरोधकांच्या निशाण्यावर आलेले संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. बंजारा समाजाचे धर्मगुरू स्वर्गीय रामराव महाराज यांचे धर्मपिठाधिश्वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!