Share

कचरा प्रक्रिया केंद्रावर आयुक्त ठेवणार ‘स्मार्ट वॉच’

Published On: 

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या एमएसआय प्रकल्पाअंतर्गत महापालिका आयुक्तांच्या दालनातच एक एलईडी स्क्रिनबोर्ड लावलेला आहे. याद्वारे आता पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय आपल्या दालनातूनच शहरातील कचरा संकलन, कचरा प्रक्रिया केंद्रांवर वॉच ठेवणार आहेत. यामुळे कचरा संकलन व प्रक्रिया केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कॅमेऱ्यातून आयुक्तांच्या निदर्शनास आल्यास त्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागू शकते.

औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी योजनेतून एमएसआय (स्मार्ट सिस्टीम इंडिग्रेटेड) प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या अंतर्गत शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कार्यान्वित झालेल्या चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या ठिकाणी देखील सीसीटीव्ही लावले आहेत. आयुक्तांच्या दालनातही एक स्क्रिनबोर्ड लावला आहे. एमएसआयअंतर्गत शहरातील सर्व कॅमेरे, डिस्प्ले बोर्ड त्याच्याशी जोडले गेले आहे. परिणामी, यामुळे आयुक्त पांडेय यांना आपल्या दालनातून शहरात कचरा संकलनाची वाहने नेमकी कुठे उभी आहेत, त्यांचे काम कसे चालू आहे, हे पाहता येणार आहे. कुठे काही गैरप्रकार होत असल्यास तेही कॅमेऱ्याद्वारे आयुक्तांच्या निदर्शनास येणार आहे.

वाहतुकीवर नियंत्रण :  एमएसआय प्रकल्पाचे नुकतेच लोकापर्ण झाले आहे. शहरात एकूण ७०० सीसीटिव्ही कॅमेरे, ५० डिस्प्ले डिजिटल बोर्ड लावले असून शंभर किलोमीटरहून अधिक केबल टाकली आहे. तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यावर आयकॅट, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूकीचे नियम दर्शविणारे फलक, ठिकठिकाणी मार्गदर्शविणारे फलक, सीसीटिव्हीवरुन वॉच ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय व पालिकेत कंमांड कंट्रोल रुम उभारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!