Share

मनपाच्या सीबीएससी शाळांमध्ये प्रवेशास सुरुवात; लवकरच लागणार हाऊसफुलचा बोर्ड!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील गरीब व होतकरू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएससी शाळा सुरु करण्याचा निर्णय महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. उस्मानपुरा व गारखेडा येथील शाळांमध्ये सीबीएसई प्रवेशासाठी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद दिसून येत आहे. आजपर्यंत उस्मानपुरा शाळेत २४ प्रवेश व गारखेडा शाळेत २५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. प्रवेशाचा ओघ पाहता लवकरच या शाळांमध्ये हाऊसफुलचा बोर्ड आपल्याला पहावयास मिळेल अशी माहिती उपायुक्त डाॅ. संतोष टेंगळे यांनी दिली.

या दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. एलकेजी, यूकेजी, फर्स्ट आणि सेकंड हे चार वर्ग या शाळांमध्ये सुरु करण्यात आलेले आहेत. ज्या मुलांना सीबीएससी मधून शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांना एलकेजी, यु केजी, फर्स्ट आणि सेकंड या चार वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील अनेक शिक्षक अत्यंत हुशार व विद्यार्थी प्रिय आहेत. या शिक्षकांमधूनच निवड करून पंचवीस ते तीस शिक्षक सीबीएससीचे वर्ग घेण्यासाठी निवडले आहेत.

या सर्व शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे सर्व शिक्षक सीबीएससी अभ्यासक्रम शिकवत आहेत. या दोन्ही शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही शाळेत सीबीएसई वर्ग योग्यप्रकारे चालविण्यासाठी, शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी, सर्व स्तरातील मुलामुलींना प्रवेश मिळावा, प्रत्येक पालकाला ही शाळा आपली वाटावी या हेतूने अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, उपायुक्त डाॅ. संतोष टेंगळे, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे तसेच सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!