🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्यात पिकांच्या डवरणीसह, निंदणाच्या कामाला सुरूवात कोळपणी करून खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पिकांच्या कोळपणीसह खुरपणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात बहुतांश शेतक-यांनी यंदा मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी केली. यामुळे सध्या सोयाबीन, कापूस, मका उडीद, तूर, मूग आदी पिके जोमात असून डावरणीसह, निंदणाच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाने खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात जीवदान मिळाले असून पिके बहरू लागली आहेत. तालुक्यात यावर्षी कापूस लावण्यासह सोयाबीन पेरणीला सर्वाधिक पसंदी शेतक-यांनी दिल आहे. या खालोखाल तूर पिकाची पेरणी झाली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीलाच पेरणी योग्य पाऊस झाल्याने पिके जोमात बहरू लागल्याने पिकांची कोळपणी, खुरपणी करण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. मात्र, खुरपणीच्या कामासाठी काही भागात मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. मजुरांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी शेती कामासाठी कमीत कमी खर्चात वेगवेगळ्या उपाय योजना करताना दिसून येत आहे. सध्या बैलाने डवरणी केली जात आहे. यामुळे कमी वेळेत जास्त काम होत असल्याने मजुरांचा होणारा खर्चाही बचत होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खुरपणीच्या कामासाठी महिला मजुरांना २०० ते २५० रुपये रोजगार द्यावा लागत असल्याने शेतक-यांना उत्पन्नाच्या मानाने ते परवडत नाही. बैलांच्या साहाय्याने डवरणी केल्यास दर दिवशी तीन ते चार एकर क्षेत्रातील पिकांची डवरणी सहज होते. जर हेच काम मजुरांच्या साहायाने करायचे झाल्यास पाच मजूर लावून दिवसभर खुरपणी केली तरी अध्या एकरवरील क्षेत्राचीही खुरपणी होत नाही. कामासाठी महिला मजुरांना १५० ते २०० रुपये रोजगार द्यावा लागत असल्याने असल्याने शेतकयांना उत्पन्नाच्या मानाने ते परवडत नाही. शेतकरी बैलाच्या सहाय्याने डवरणी करण्यासाठीच अधिक पसंदी देत असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्यांच्या नावांची आहे सर्वाधिक चर्चा
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
