Share

परतूर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा कधी मिळणार? ‘ते नंतर बघू’- राजेश टोपे

Published On: 

जालना: परतूर येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची परतूर तालुक्यातील जनतेची मागणी आहे. या बाबत टोपे यांना विचारले असता, सध्या मंठा येथे प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यास आमचे प्राधान्य आहे.परतूरकरांची उपजिल्हा रुग्णालयाची मागणी आहे, यावर नंतर विचार करता येईल असे म्हणत टोपे यांनी प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला.

जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यात दौऱ्यात राजेश टोपे यांच्या हस्ते आधारवड फाऊंडेशन आणि ग्रामीण रुग्णालय परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या १८ बेडच्या डेडीकेडेड कोव्हिड केअर सेंटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना टोपे म्हणाले, ग्रामीण रुग्णालयात रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात येतील, या संबंधी आवश्यक त्या सूचना यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

परतूर उपजिल्हा रुग्णालयासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा परतूरचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते, मात्र नंतरच्या काळात भाजपा सरकार सत्तेवर आले नाही, लोणीकरांच्या प्रयत्नांना इथेच ब्रेक लागला. विरोधी पक्षाचा आमदार असलेल्या मतदार संघात आपण उपजिल्हा रुग्णालय दिले तर त्याचे श्रेय विरोधी पक्षालाच जाईल, या भीतीपोटी राजेश टोपेंनी परतूरच्या उपजिल्हा रूग्णालयाचा प्रश्न मनावर घेतला नाही. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची अकार्यक्षमता देखील या मागचे दुसरे कारण असल्याचे बोलले जाते.

मंत्री राजेश टोपे आजच्या दौऱ्यात परतूरसाठी मोठी घोषणा करतील, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावतील अशी आशा असतांना, परतूर उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावावर सध्यातरी विचार शक्य नाही असे स्पष्ट सांगितल्याने परतूरकरांचा हिरमोड झाला आहे. आरोग्य मंत्री आले अन, ठेंगा दाखवून गेले अशी भावना परतूरकर व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!