Share

‘मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनलेय’

Published On: 

मुंबई   -पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनलेय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

आता कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत असे सांगतानाच तेलाची लूट थांबवावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, गेले दोन दिवस इंधनाच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलचा दर हा 87 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ झाली होती. आजही देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 18 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 26 ते 35 पैसे प्रतिलिटरपर्यंत वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!