Share

दिलासा! दुसऱ्या लाटेनंतर औरंगाबादेत कोरोनाबाधित बालकांचे प्रमाण घटले

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधित बालकांच्या संख्येत मोठी वाढ होत होती. मात्र आता दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाबाधित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार मागील आठ दिवसात केवळ ७ बालके कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यात शून्य ते पाच वयोगटातील दोन तर सहा ते अठरा वयोगटातील पाच बालकांचा समावेश आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत सर्वाधिक धोका हा बालकांना असल्याचे तज्ज्ञांनी वर्तवले आहे. त्यामुळे राज्य सरकार व प्रशासनाने आवश्यक ती खबरदारीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करुन त्यांच्या मार्गदर्शनानुसार सध्या काम केले जात आहे. स्थानिक पातळीवर औरंगाबाद पालिकेने देखील अशाच प्रकारे काम सुरु केले आहे. गरवारे कंपनीच्या माध्यमातून बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी केली जात आहे. एमजीएमच्या स्पोर्टस् कॉम्पलेक्समध्ये देखील बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी सुरू आहे.

दोन्हीही ठिकाणी प्रत्येकी शंभर खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय बाधित गरोदर मातांसाठी सिडको एन-८ येथील पालिकेच्या दवाखान्यात पन्नास खाटांचे केअर सेंटर देखील उभारले जाणार आहे. पालिकास्तरावर ही तयारी सुरु असताना शहरात दुसरी लाट ओसरली असून त्यात बाधित बालकांची संख्या देखील आता कमी होताना दिसत आहे. १० ते १७ जून दरम्यान केवळ सात बालके शहरात बाधित आढळली आहेत. त्यात शून्य ते पाच या वयोगटातील दोन तर सहा ते अठरा या वयोगटातील पाच बालकांचा समावेश आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत शून्य ते पाच वयोगटातील १३९४ तर सहा ते अठरा या वयोगटातील ७८१० अशा एकूण ९२०४ बालके कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!