Share

‘परत या परत या, राहुल गांधी परत या’ ; भाजपा नेत्यांची उपरोधिक टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : २०१९ लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये राहुल गांधी यांची तत्कालीन अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने देशभरात बहुमत मिळवत केंद्रामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली.

या निवडणुकांच्या निकालाने काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे या पराभवाची नैतिकता स्वीकारत राहुल गांधी यांनी जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर, त्यांनी देखील काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.

शिवसेनेच्या ‘या’ ढाण्या वाघाला कोरोनाचा घेराव

काल काँग्रेस कार्यसमितीच्या तब्बल ७ तास झालेल्या बैठकीनंतर हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पुढील ६ महिने काँग्रेस अध्यक्षपदी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरूनच भाजपाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून राहुल गांधी यांनाच पुन्हा अध्यक्षपदी विराजमान करा अशी मागणी करत उपरोधिक टीका केली आहे.

मोठी बातमी : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण!

कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी,” परत या, परत या, राहुल गांधी परत या…” अशी घोषणाच दिली. यासोबतच सोनिया गांधी यांच्या निवडीवरून काँग्रेस पक्षावर देखील टीका केली आहे. ” सात तासांच्या सखोल चर्चेनंतर काँग्रेस कार्य समितीचा ऐतिहासिक निर्णय. काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा सोनिया. लोकशाहीचा विजय असो…”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे अध्यक्षपद ‘गांधी’ घराण्याकडेच!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!