कोल्हापूर : गेले ५ महिने कोरोनाने राज्यासह देशात थैमान घातले आहे. या रोगाने अनेक राजकीय नेत्यांसह, बॉलिवूड स्टार्स आणि केंद्रीय मंत्र्यांना देखील विळखा घातल्याचे दिसून आले आहे. आता, कोल्हापूर लोकसभेचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी देखील कोल्हापुरातील तीन आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
आता, खासदार संजय मंडलिक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना कोरोनाने घातलेला विळखा अधिकच घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. संजयमंडलिक यांच्यासह कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मोठी बातमी : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण!
मंडलिक यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली होती, तर कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना देखील २१ ऑगस्ट रोजी कोरोना झाल्याचे समोर आले होते. हे दोन्ही आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत.
काँग्रेसचे अध्यक्षपद ‘गांधी’ घराण्याकडेच!
आता, पर्यंत जिल्ह्यातील तीन आमदारांना व एका खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे यांचा देखील काही दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
#फेक : पुण्यातील मेट्रो ब्रीज कोसळल्याचे व्हायरल फोटो खोटेच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
